Akash Ambhore
ॲड. आकाश अर्जुना अंभोरे यांनी विज्ञान शाखेतील पदव्युत्तर शिक्षण (M.Sc.) तसेच विधी शाखेची पदवी (LL.B.) संपादन केली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा, पेडगाव (ता. रिसोड, जि. वाशीम), माध्यमिक शिक्षण भारत माध्यमिक शाळा, चिंचाबा पेन आणि पदवीचे शिक्षण रा. ल. तो. विज्ञान महाविद्यालय, अकोला येथे झाले. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून M.Sc. आणि अमोलकचंद विधी महाविद्यालय, यवतमाळ येथून LL.B. पदवी प्राप्त केली.
विद्यार्थीदशेपासूनच त्यांचा सामाजिक आणि विद्यार्थी चळवळींमध्ये सक्रिय सहभाग राहिला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत कार्यरत असताना त्यांनी पुणे विद्यापीठ विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर धुळे व नंदुरबार या जनजातीबहुल जिल्ह्यांमध्ये पूर्णवेळ कार्य करत जिल्हा संघटन मंत्री आणि प्रदेश सहमंत्री या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. तसेच जनजाती कल्याण आश्रमाच्या माध्यमातून जनजाती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य केले.